नागपूर,
district-sports-awards-2025-26जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू (पुरुष, महिला व दिव्यांग) तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या क्रीडा मार्गदर्शकांना सन २०२५-२६ चा जिल्हा क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने पात्र उमेदवारांकडून २४ डिसेंबरपर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
या पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि १० हजार रुपये असे आहे. खेळाडू पुरस्कारांतर्गत पुरुष, महिला व दिव्यांग अशा तीन गटांत, तर गुणवंत क्रीडा मार्गदर्शकासाठी स्वतंत्र पुरस्कार देण्यात येणार आहे. अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग १५ वर्षे वास्तव्य असणे आवश्यक आहे. तसेच खेळाडू व मार्गदर्शकांसाठी शासनाने निश्चित केलेल्या पात्रता व अटी लागू राहतील.
इच्छुकांनी विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज २४ डिसेंबर २०२६ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर, नागपूर येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत. अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी अनिल बोरवार (९४२२१५९०८३) यांच्याशी संपर्क साधावा. मुदतीनंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नसल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी शशिकांत कळंबे यांनी कळविले आहे.