अनिल कांबळे
नागपूर,
unauthorized hoardings शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज आणि बॅनर्सच्या सुळसुळाटावरून मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने मनपाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. आता यापुढे अशा अनधिकृत होर्डिंग्जवर जबर दंड ठोठाऊ, असा इशारा हायकोर्टाने दिला आहे. याचिकेवर आता सोमवारी (३0 नोव्हेंबर) रोजी न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती रजनीश व्यास यांच्यासमक्ष सुनावणी निश्चित करण्यात आली आहे.
सामाजिक कार्यकर्ते दिनेश नायडू विरुद्ध नागपूर महानगरपालिका या अवमान याचिकेवरील सुनावणीदरम्यान मनपा आयुक्तांनी शुक्रवारी हायकोर्टात २०२६ या वषार्तील कारवाईची आकडेवारी सादर केली. यामध्ये मनपाने १०,०२३ अनधिकृत होर्डिंग्जची प्रकरणे शोधून काढल्याचे नमूद केले; परंतु या सर्व प्रकरणांतून केवळ २७ हजार रुपये इतकाच दंड वसूल करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली.unauthorized hoardings सुनावणीदरम्यान याचिकाकर्ते दिनेश नायडू यांचे वकील डॉ. तुषार मंडलेकर यांनी मनपाच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवले. गेल्या वर्षी मनपाने तब्बल २० हजार अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई केल्याची नोंद आहे, असे त्यांनी हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. मात्र, अनधिकृत होर्डिंग्ज लावण्यामध्ये अनेक राजकीय व्यक्तींचा सहभाग असल्याचे स्पष्ट होऊनही त्यांच्याविरुद्ध अद्याप एकही एफआयआर नोंदवला जात नसल्याचा गंभीर आरोप डॉ. मंडलेकर यांनी केला.
१,९५८ जणांना कारणे दाखवा नोटीस
यापूर्वी १० डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने अनधिकृत होर्डिंग्ज लावणाºयांकडून प्रति होर्डिंग ५ लाख रुपये दंड वसूल करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशाच्या अनुषंगाने मनपाने आतापर्यंत १,९५८ जणांना नोटिसा बजावल्या असल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली. तथापि, दहा हजारांहून अधिक प्रकरणे आढळूनही केवळ २७ हजार रुपयांची नगण्य दंडवसुली आणि राजकीय नेत्यांवरील कारवाईस होणारी टाळाटाळ यामुळे न्यायालयाने कठोर भूमिका घेतली असून, आता न्यायालय स्वत:च या प्रकरणात मोठा दंड आकारणार असल्याचे स्पष्ट केले आहे.