शाळा, महाविद्यालयात बुरख्यावर बंदी

इटलीमध्ये शिक्षण सुधारणा कायद्याला मंजुरी

    दिनांक :28-Nov-2026
Total Views |
रोम,
italy-hijab-niqab-banइटलीतील मेलोनी सरकारने शिक्षण प्रणालीत मोठ्या सुधारणांना मंजुरी दिली. नवीन कायद्यानुसार महाविद्यालय, शाळांमध्ये बुरखा आणि निकाब घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने १४२ मतांनी याला मंजुरी दिली. परदेशी विद्यार्थ्यांसाठीचे नियमही बदलण्यात आले आहेत.
 

burkha 
नव्या कायद्यानुसार, शाळांमध्ये चेहरा झाकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पहिल्या इयत्तेतील परदेशी वंशाच्या विद्यार्थ्यांची संख्या ३० टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्यात आली आहे. विरोधी पक्षांनी या निर्णयाला भेदभावपूर्ण म्हटले आहे. कायद्यातील सुधारणेला १४२ मतांनी बाजूने, ११२ मतांनी विरोधात आणि चार तटस्थ मतांनी मंजुरी दिली.
या सुधारणेअंतर्गत, ज्या परदेशी पालकांच्या मुलांना देशाच्या शिक्षण प्रणालीशी जुळवून घेण्यास अडचण येत आहे, त्यांच्यासाठी इटालियन भाषेचे अभ्यासक्रमही सुरू केले जातील. मुस्लिम विद्यार्थिनींना वर्गात बुरखा आणि निकाब घालण्याची परवानगी दिली जाणार नाही. ज्या विद्यार्थ्यांना इटालियन भाषेचे पुरेसे ज्ञान आहे, त्यांना परदेशी विद्यार्थ्यांवरील ३० टक्क्यांची मर्यादा लागू होणार नाही.
परदेशी पालकांचे काय?
नवीन कायद्यात परदेशी पालकांसाठी इटालियन भाषेच्या अभ्यासक्रमांचीही तरतूद आहे. कायद्यातील सुधारणांना मंजुरी मिळाल्यानंतर पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी जाहीर केले की त्यांचे सरकार शाळांमध्ये बुरखा आणि निकाबवर बंदी घालण्यासाठी, वर्गांमधील परदेशी विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित करण्यासाठी आणि एकरूप होण्यासाठी संघर्ष करणाऱ्या मुलांच्या पालकांना इटालियन भाषा शिकणे अनिवार्य करण्यासाठी वचनबद्ध आहे.