मुंबई,
sharad-pawar-adani-meetingराष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यादरम्यान शनिवारी सकाळी उद्योगपती गौतम अदानी यांनी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. अदानी यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून माझगाव येथील कॅन्सर रुग्णालयात नेण्यात आले होते. तिथे त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. सध्या त्यांच्यावर याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, शरद पवार यांच्यावर उपचार सुरू असतानाच गौतम अदानी यांनी त्यांची भेट घेतली. शनिवारी सकाळीच अदानी अचानक ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचले.