तेहरान,
us-strike-pacific-archer-shipअमेरिकेच्या लष्कराने ओमानच्या आखातातील नाकाबंदी तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका मालवाहू जहाजाला लक्ष्य करत क्षेपणास्त्राचा मारा केला. यात पलाऊचा ध्वज असलेले ‘एमव्ही पॅसिफिक आर्चर’ जहाज उद्ध्वस्त झाले.या हल्ल्यात २२ खलाशी बचावल्याची माहित इराणच्या आयआरजीसीने दिली आहे.
अमेरिकेच्या लष्कराने हल्ल्याची पुष्टी करताना म्हटले की, पलाऊचा ध्वज असलेले जहाज अमेरिकेची नाकाबंदी चुकवण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा एका लष्करी विमानाने अचूक शस्त्रांनी जहाजाच्या मागील भागावर हल्ला करून त्याची प्रोपल्शन प्रणाली निकामी केली. जहाजावरील सर्व नागरी खलाशी सुरक्षित आहे. हे जहाज इराणच्या बंदर अब्बास बंदरातून निघाले आणि सिंगापूरला जात होते. त्याने अमेरिकेची नाकाबंदी चुकवण्याचा प्रयत्न केला.
अमेरिकेने एप्रिलपासून इराणच्या बंदरांवर नाकाबंदी लादली आहे. नाकाबंदी पुन्हा लागू झाल्यापासून त्यांनी १५८ व्यापारी जहाजांना आपले मार्ग वळवण्यास भाग पाडले आहे. तसेच, आदेशांचे पालन न करणारी जहाजेही निकामी केली आहेत.