नवी दिल्ली,
vit opportunity प्रसिद्ध वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने (व्हीआयटी) अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या व्हीआयटीईईई २०२७ या प्रवेश परीक्षेची अधिकृत अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची संधी आहे. संस्थेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, इच्छुक विद्यार्थ्यांना वेल्लोर, चेन्नई, अमरावती (आंध्र प्रदेश) आणि भोपाळ (मध्य प्रदेश) येथील कॅम्पसमध्ये प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी व्हीआयटीच्या अधिकृत [viteee.vit.ac.in](https://viteee.vit.ac.in) या संकेतस्थळाला भेट द्यावी. प्रवेश प्रक्रियेबाबतची माहिती आणि अर्जासंबंधीचे तपशीलही या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
व्हीआयटीईईई २०२७ ही प्रवेश परीक्षा २८ एप्रिल ते २ मे २०२७ या कालावधीत एकाच टप्प्यात घेतली जाणार आहे. देशभरातील १३३ परीक्षा केंद्रांवर, तसेच परदेशातील ९ केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे भारतासह परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या प्रवेश परीक्षेला बसण्याची संधी उपलब्ध होणार आहे.vit opportunity चार कॅम्पसमधील अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.