बुलढाणा,
buldhana pays क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील जयस्तंभ चौक येथे शनिवारी, २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेलाही पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. उत्सव समितीचे अध्यक्ष गोपाल निळकंठ, सचिव पी. एन. बोदडे आणि कार्याध्यक्ष निलेश गोरे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी महात्मा ज्योतिराव फुले मंडळाचे माजी अध्यक्ष पी. सी. चौधरी, श्रीकृष्ण अवचार, हरिभाऊ पल्हाडे, विद्यमान अध्यक्ष प्रकाश वानरे, सचिव सुरेश चौधरी, विश्वनाथ माळी, अॅड. शरद राखोंडे, पी. पी. वाघमारे,हरिभाऊ कुडके, दिलीप इंगळे, हरिदास भोपळे, राजू पवार, अशोक गोरे, शंकर वानरे, सतीश उबाळे, विजय राऊत, सुरेश उबाळे, सुरेश तायडे, चंद्रकांत उमाळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. तसेच कास्ट्राईब संघटनेचे धंदरे साहेब, पोलीस उपनिरीक्षक आणि अशोक इंगोले यांनीही उपस्थित राहून अभिवादन केले. उत्सव समितीच्या महिला अध्यक्ष वंदना गोपाल निळकंठ यांच्यासह रंजना पवार, रूपाली भोपळे, वेणू हिरडकर, पल्लवी सोनवणे, गीता गोरे, छाया राऊत, शोभा भोपळे, प्रीती खंडारे, प्रीती डांगे, योगिता इंगळे, सुचिता वानखेडे, जया चौधरी आणि स्नेहलता मानकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला शहरातील समाजबांधव, महिला आणि फुलेप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.