अमेरिकेत भूकंपाचे धक्के!

विमान लँडिंग करत होते, तितक्यातच..

    दिनांक :29-Nov-2026
Total Views |
अमेरिका,
california-earthquake-lax-flights-haltedअमेरिकेतून मोठी बातमी पुढे येत आहे. दक्षिण कॅलिफोर्नियाच्या किनारपट्टीजवळ भूकंप झाला. तब्बल 5.0 तीव्रतेचा हा भूकंप होता. ज्यामुळे लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळावरील लँडिंग रद्द करण्यात आले. विमानतळाहून ही सूचना पाठवण्यात आली. सर्व एअरलाईन्सच्या विमानांचे उड्डाण रोखण्यात आली. एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये तो तणावपूर्ण क्षण कैद झाला आहे. अचानक लँडिंग रद्द करण्यात आल्याने गोंधळ उडाला. काही विमाने लँडिंगसाठी तयार असताना अचानक लँडिंग रद्द करण्यात आले. तीव्र धक्के जाणवल्यानंतर कंट्रोलरने डेल्टा फ्लाईट 1972 ला वारंवार विमान पुन्हा हवेत वळवण्यास सांगितले. कारण भूकंपाचे अत्यंत तीव्र झटके जावत होते. अशावेळी जर विमान लँडिंग झाले तर सर्व प्रवाश्यांची जीव धोक्यात आली असती.
 

earthquake 
ऑडिओमध्ये कंट्रोलर असे म्हणताना ऐकू येत आहे की, डेल्टा 1972 पुन्हा हवेत परत जात. डेल्टा 1972 वापस जा, कोणत्याही परिस्थितीमध्ये विमान इथे उतरू नका. परत जा. हेल्टा 1972 हवेत पुन्हा जा. इथे मोठा भूकंप होत आहे… विमानतळाच्या काही भागांत भूकंपाचे धक्के जाणवू लागले. वैमानिकाने सूचनांचे पालन करत लँडिंगचा प्रयत्न थांबवला.
पण याकरिता त्यांना तारेवरची कसरत करावी लागली. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, पहिला धक्का स्थानिक वेळेनुसार सकाळी 9 वाजून 30 मिनिटाला बसला. कॅलिफोर्नियामधील मॅनहॅटन बीचच्या किनाऱ्यापासून सुमारे सहा मैल अंतरावर नोंदवला झाली. या भूकंपामुळे लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनलच्या काचेच्या खिडक्याही फुटल्या. हा एक तीव्र भूकंप होत.