नागपूर,
digital-wellness-inner-powerआधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल साधनांचा वाढता वापर, माहितीचा प्रचंड प्रवाह आणि बदलती जीवनशैली यामुळे मानवी मनावर विविध प्रकारचे मानसिक व भावनिक परिणाम होत आहेत. अशा परिस्थितीत मनःशांती, मानसिक संतुलन आणि आत्मिक शक्तीचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि ब्रह्माकुमारी नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डिजिटल वेलनेस : मास्टरिंग द माइंड अँड अनलॉकिंग इनर पॉवर’ या विषयावर विशेष मार्गदर्शनपर सत्राचे आयोजन करण्यात आले.
विद्यापीठाच्या मानव विज्ञान विद्याशाखा भवनातील राज्यशास्त्र विभागाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला ब्रह्माकुमारी नागपूरच्या उपसंचालिका मनीषा दीदी यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून प्रा. ई. व्ही. गिरीश यांनी मार्गदर्शन केले.या व्याख्यान सत्राचे आयोजन इतिहास विभागांतर्गत कार्यरत ‘धरोहर–द हिस्टॉरिकल सोसायटी’च्या वतीने करण्यात आले होते. इतिहास विभागाचे प्रमुख डॉ. श्यामराव कोरटी आणि राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विकास जांभुळकर हे कार्यक्रमाचे आयोजक होते. कार्यक्रमाचा मुख्य विषय डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरासोबतच मानसिक स्वास्थ्य आणि अंतर्मनातील शक्तीच्या विकासावर केंद्रित होता. कार्यक्रमाला डॉ. अलिशा सहाय यांचे सहकार्य लाभले.