गुटखा व्यापाऱ्याच्या ठिकाणांवर ईडीचे छापे

    दिनांक :29-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली,
ed-action-gutkha-smuggling-caseअंमलबजावणी संचालनालयाच्या गुवाहाटी विभागीय कार्यालयाने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुवाहाटी, आसाममधील पलासबारी आणि मेघालयातील शिलाँग येथील सहा ठिकाणी शोधमोहीम राबवली. गुटखा, पान मसाला आणि जर्दा यांच्या प्रतिबंधित व्यापारात सामील असलेल्या उदय चौरसिया आणि साथीदारांविरुद्धच्या मनी लाँडरिंग तपासासंदर्भात ही कारवाई करण्यात आली.
 

ghutkha 
 
आसाम पोलिसांच्या विशेष कृती दल पोलिस ठाण्यात उदय चौरसिया आणि इतरांविरुद्ध दाखल एफआयआरच्या आधारे ईडीने हा तपास सुरू केला होता. या प्रकरणात गुटखा, पान मसाला आणि जर्दा यांचा एक मोठा साठा दिल्लीहून गुवाहाटीला रेल्वेने नेला जात होता. हा माल कापड असल्याचे भासवून, त्याच्या वाहतुकीसाठी बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आला. कामरूपमधील अझारा रेल्वे स्थानकावरील दोन वॅगनमधून ३४१ पाकिटे जप्त करण्यात आल्यानंतर या गाेरखधंद्याचा भंडाफाेड झाला़ पान मसाला आणि जर्दाचा व्यापार प्रामुख्याने रोखीत चालत होता.
 
चाैरसिया आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या बँक खात्यांमध्ये अंदाजे १,८५१ कोटी रुपये रोख जमा करण्यात आले. शोधमोहिमेत चौरसिया यांच्या कंपन्यांनी खरेदीपैकी १५ ते २० टक्के खरेदी बिलांशिवाय केल्याचे तपासात समाेर आले़