नवी दिल्ली,
gold-price-update-indiaसोने आणि चांदीच्या खरेदी करणाऱ्यांना गेल्या काही दिवसांमध्ये मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या दरात झालेले बदल जाणून घेणं महत्त्वाचं आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या काही आठवड्यांमध्ये घसरण झालेल्या सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. सोने आणि चांदीचे दर सध्या वाढत असले तरी 1 किलो चांदीचा दर उच्चांकाच्या तुलनेत 2.67 लाख रुपयांनी स्वस्त झाला आहे. तर, 24 कॅरेट सोन्याचा दर उच्चांकाच्या तुलनेत 68 हजार रुपयांनी स्वस्त झाला आहे.
सोन्याच्या दरात एमसीएक्स आणि सराफा बाजारात बदल झाले आहेत. 4 डिसेंबरला संपणाऱ्या वायद्याचे 24 कॅरेट सोन्याचा दर 125350 रुपये आहे. वायदेबाजारात सोन्याच्या दरानं जानेवारी महिन्यात 1.93 लाख रुपयांचा उच्चांक गाठला होता. त्या तुलनेत सोन्याचा दर सध्या 68 हजार रुपयांनी स्वस्त झाला आहे.
देशांतर्गत बाजारात इंडिया बुलियन्स ज्वेलर्स असोसिएशनकडून जारी करण्यात आलेले दर सर्वत्र सारखे असतात. आयबीजेएकडून सोने आणि चांदीचे दर दिवसातून दोन वेळा जाहीर केले जातात. सोन्याच्या दराचा विचार केल्यास चार दिवसांमध्ये सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 123893 रुपये प्रति 10 ग्रॅमवरुन शुक्रवारपर्यंत 126299 रुपयांपर्यंत पोहोचला होता.
आयबीजेएकडून जारी करण्यात आलेल्या दरांनुसार 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 126299 रुपये, 22 कॅरेट सोन्याचा दर 123270 रुपये, 20 कॅरेट सोन्याचा दर 112410 रुपये आहे. तर 18 कॅरेट सोन्याचा दर 102300 रुपये आहे.