दिल्लीत लष्करच्या दहशतवाद्याला अटक

    दिनांक :29-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली,
jaish-terror-module-delhiदिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित एका संशयिताला दिल्लीत अटक केली आहे. आरोपी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दहशतवादी कारवायांमध्ये सामील होता़ ताे दिल्ली-एनसीआरमध्ये दहशतवादी हल्ल्यांचा कट रचत होता. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली. उमर, असे आराेपीचे नाव आहे़.
 

terror 
पाेलिसांनुसार, उमरचे संबंध गुजरातच्या वडोदरा येथे अटक केलेल्या एका दहशतवादी मॉड्यूलशी आणि पाकिस्तानस्थित हँडलर्सशी आहेत. ताे सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना कट्टरपंथी बनवून त्यांना दहशतवादी नेटवर्कमध्ये भरती करण्याचा प्रयत्न करत होता, असे प्राथमिक तपासात समाेर आले आहे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणा बऱ्याच काळापासून उमरच्या ऑनलाईन हालचालींवर लक्ष ठेवून होत्या. माहितीची खात्री केल्यानंतर स्पेशल सेलने त्याला अटक केली. आरोपी व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि इन्स्टाग्रामवर 'उमर' या नावाने सक्रिय होता. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून कट्टरपंथी व्यक्तींच्या संपर्कात होता, असेही उघड झाले आहे.
पाेलिसांनी उमरचा मोबाइल आणि इतर डिजिटल उपकरणे जप्त करून तपासणीसाठी पाठवले आहेत. प्राथमिक तपासात पाकिस्तानस्थित कथित हँडलर्सचे नंबर समोर आले आहेत. हे नंबर बॉस, जट साहेब आणि डॉक्टर यांसारख्या नावांनी सेव्ह केले होते. या हँडलर्सच्या निर्देशानुसार दिल्ली, गुजरात आणि देशाच्या इतर भागांमध्ये दहशतवादी कारवाया करण्याचा कट रचला जात होता, असा यंत्रणांना संशय आहे.