अकोला,
fire at a spinning mill जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील कान्हेरी सरप परिसरात असलेल्या रोहाटीया स्पिनर या सूतगिरणीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. प्राथमिक अंदाजानुसार, विद्युत शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अकोला एमआयडीसीचे दोन ते तीन अग्निशमन बंब, तर महानगरपालिकेचे दोन अग्निशमन बंब आग विझविण्यासाठी दाखल झाले.fire at a spinning mill अग्निशमन जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले.
या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, सूतगिरणीतील साहित्य आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. प्राथमिक स्तरावर शॉर्ट सर्किटचा संशय व्यक्त केला जात असून, पुढील तपासानंतरच आगीचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.