‘मिशन झिरो रिस्क’मधून रस्ते सुरक्षेचा संदेश; विद्यार्थ्यांचा सहभाग

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, उपायुक्त आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन

    दिनांक :29-Nov-2026
Total Views |
नागपूर,
nagpur-mission-zero-risk-campaignशहरातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासोबतच नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी नागपूर शहर पोलीस वाहतूक शाखेच्या वतीने ‘मिशन झिरो रिस्क’ हा जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थी आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे सहभाग घेत रस्ते सुरक्षेचा संदेश दिला.
 

mission 
या उपक्रमाला पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि पोलीस उपायुक्त आदित्य मिरखेलकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस विभागातील अधिकारी तसेच वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
रस्ते सुरक्षा ही केवळ वाहतूक पोलिसांची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, हा विचार या उपक्रमातून मांडण्यात आला. विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम, रस्त्यावर वावरताना घ्यावयाची काळजी, सुरक्षित प्रवासाचे महत्त्व आणि जबाबदार नागरिक म्हणून पाळावयाच्या नियमांची माहिती देण्यात आली.
प्रश्नोत्तरे आणि संवादाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. लहान वयापासूनच रस्ते सुरक्षेचे संस्कार रुजल्यास भविष्यात जबाबदार वाहनचालक आणि जागरूक नागरिक घडण्यास मदत होईल, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.‘नियम पाळा, अपघात टाळा आणि सुरक्षित नागपूर घडवा’ हा संदेश देत वाहतूक पोलिसांनी नागरिकांना रस्ते सुरक्षेसाठी सक्रिय सहभागाचे आवाहन केले.