नागपुरात 8 वर्षीय मुलीवर अत्याचार; 60 वर्षीय शेजाऱ्याला अटक

    दिनांक :29-Nov-2026
Total Views |
नागपूर,
nagpur-pocso-caseनागपूर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेजारीच राहणाऱ्या 60 वर्षीय वृद्धाने 8 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
 

posco 
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने मुलीला धमकी देऊन हा प्रकार लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रकार समोर आल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी नेहरू पाचरे विरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करून बेड्या ठोकण्यात आल्या असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.