नागपूर,
nagpur-police-nirbhaya-squad-reviewमहिलांच्या सुरक्षिततेला अधिक प्राधान्य देत नागपूर शहर पोलीस दलाचे निर्भया पथक अधिक सक्षम आणि सतर्क करण्याच्या दृष्टीने पथकाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी पोलीस आयुक्त (उत्तर विभाग) विनिता साहू आणि पोलीस उपायुक्त, झोन रश्मिता राव यांच्या उपस्थितीत निर्भया पथकातील अधिकारी व अंमलदारांना महिला सुरक्षेच्या अनुषंगाने आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेल्या निर्भया पथकाच्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी पथकाची कार्यपद्धती, सतर्कता, गस्त व्यवस्था तसेच महिलांच्या तक्रारींना प्रतिसाद देण्याच्या यंत्रणेचा आढावा घेण्यात आला. महिलांना सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित वातावरण मिळावे, त्यांना कोणत्याही भीतीशिवाय वावरता यावे आणि अडचणीच्या प्रसंगी पोलिसांकडून तातडीने मदत उपलब्ध व्हावी, यासाठी पथकाने अधिक प्रभावीपणे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
महिलांची सुरक्षितता, त्यांचा सन्मान आणि त्यांच्यात पोलिसांविषयी विश्वास निर्माण करणे हा निर्भया पथकाचा मुख्य उद्देश आहे. महिला सुरक्षेसाठी नागपूर शहर पोलीस दल कटिबद्ध असून, निर्भया पथकाच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक बळकट करण्यावर भर दिला जात आहे.