कारंजा लाड,
illegal cattle transport जिल्ह्यात अवैध गोवंश वाहतुकीविरोधात वाशीम पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला असून, कारंजा शहर परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत पाच गोवंश बैलाची सुटका करण्यात आली. या कारवाईत ४ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांनी जिल्ह्यात अवैध गोवंश वाहतुकीविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे २८ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास कारंजा रेस्ट हाऊस ते मानोरा रोडवरील अमरपीच ग्राउंड परिसरात सापळा रचण्यात आला.यावेळी संशयित वाहन क्रमांक एमएच ४८ बीएम ३६७३ अडवून तपासणी केली असता, वाहनामध्ये निर्दयपणे कोंबून ठेवलेले गोवंश आढळून आले. या जनावरांच्या वाहतुकीदरम्यान चारा व पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. तसेच आवश्यक कागदपत्रांशिवाय त्यांची वाहतूक केली जात असल्याचेही निदर्शनास आले.illegal cattle transportया कारवाईत पोलिसांनी पाच बैल ताब्यात घेतली. याप्रकरणी मोहम्मद साजिद मोहम्मद अकील वय २९ , रा. अस्थाना, ता. कारंजा, याच्याविरुद्ध कारंजा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक लता फड, पोलिस निरीक्षक सुधाकर आडे, पोलिस उपनिरिक्षक शेखर मास्कर, पोहेका सुरज खडके, पोहेकॉ गजानन गोटे, पोकॉ दिपक घुगे, पोकॉ भुषन ठाकरे, चापोकॉ सुनिल तायडे तसेच स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस पथकाने केली. जिल्ह्यात अवैध कृत्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असून, अशा प्रकारच्या बेकायदेशीर हालचालींबाबत नागरिकांनी पोलिसांना तत्काळ माहिती द्यावी, असे आवाहन स्थानिक गुन्हे शाखेने केले आहे.