काबूल,
taliban-ban-women-names-afghanistanअफगाणिस्तानमधील तालिबानी सरकारकडून महिलांविरोधातील दपडशाही पुन्हा एकदा समोर आली. देशातील उत्तरेकडील बल्ख प्रांतात, तालिबानच्या अधिकाऱ्यांनी अधिकृत कागदपत्रांमध्ये वैद्यकीय नोंदी आणि डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये महिलांची नावे वापरण्यावर बंदी घातली आहे. नावाऐवजी महिलांना शेळी किंवा गाय म्हणून संबोधले जात आहे. देशाच्या इतर भागांतही हा नियम लागू केला जाणार आहे.
जर्मनीत वास्तव्यास असलेल्या अफगाण महिला हक्क कार्यकर्त्या लाला उस्मानी यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, वैद्यकीय नोंदी आणि डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये काही महिलांना शेळी किंवा गाय यांसारख्या अपमानास्पद शब्दांनी संबोधले जात आहे. लोकांना माणूस न समजण्याची ही एक सुनियोजित प्रक्रिया आहे. महिला हक्कांसाठी कार्यरत असलेल्या ‘फेमेना’ या संस्थेच्या अफगाणिस्तान कार्यक्रमाच्या प्रमुख झुबैदा अकबर यांनी इशारा दिला की, ही बंदी पुढे जाऊन संपूर्ण देशात लागू होऊ शकते. स्थानिक पातळीवर सुरू केलेल्या अनेक निर्बंधांचा नंतर संपूर्ण अफगाणिस्तानात विस्तार झाल्याच्या घटनांकडे त्यांनी लक्ष वेधले. २०२१ मध्ये तालिबान सत्तेत आल्यापासून महिलांवर विविध निर्बंध लादले जात असून, हा निर्णय त्याचाच एक भाग आहे.
वैद्यकीय प्रशिक्षणावर बंदी, आरोग्यसेवेवरही परिणाम
अफगाणिस्तानमध्ये बारा वर्षांवरील मुलींच्या शिक्षणावर बंदी घालण्यात आली आहे, तर बहुतांश व्यवसायांपासून महिलांना दूर ठेवण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलांना बोलण्यावरही निर्बंध आहेत. याचा परिणाम आरोग्यसेवेवरही झाला आहे. अनेक प्रांतांत पुरुष डॉक्टरांना महिला रुग्णांवर उपचार करण्यास मनाई केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आरोग्य क्षेत्रात काम करण्याची परवानगी असलेल्या मोजक्या गटांमध्ये महिलांचा समावेश आहे, परंतु डिसेंबर २०२४ मध्ये तालिबानने महिलांच्या वैद्यकीय प्रशिक्षणावरही बंदी घातली.
महिलांनी काम करणे हा गुन्हा
प्रशिक्षित महिला आरोग्य कर्मचारी एकतर नोकरी सोडत आहेत किंवा निवृत्त होत आहेत, मात्र त्यांच्या जागी नवीन महिलांना येण्याची परवानगी दिली जात नाही. आरोग्यसेवा, शिक्षण, मदतकार्य आणि बँकिंग सेवा मिळवण्यासाठी अनेकदा कागदपत्रे लागतात. निर्बंध असूनही काही महिला लपूनछपून आपला व्यवसाय चालवत आहेत आणि गुप्त शाळा सुरू ठेवल्या आहेत. अफगाणिस्तानात महिलांनी काम करणे हा एक गुन्हा आहे.