वाशीम,
cases in shirpur जिल्ह्यातील शेतमाल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत शिरपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शेतमाल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या शेतमालासह एक चारचाकी वाहन आणि एक जुना वापरता मोबाइल असा एकूण अंदाजे ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील शेतमाल चोरीच्या घटनांमुळे परिसरातील शेतकरी चिंतेत होते. या घटनांची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळांची पाहणी, गोपनीय माहिती आणि तांत्रिक बाबींच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरविली. तपासादरम्यान मिळालेल्या महत्त्वपूर्ण माहितीच्या आधारे संशयित आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी शेतमाल चोरीच्या दोन गुन्ह्यांची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत अर्जुन पांडुरंग काटे (वय ३२) आणि गणेश पांडुरंग काटे (वय २८), दोघेही रा. जानेफळ, जिल्हा बुलढाणा यांना अटक करण्यात आली आहे.cases in shirpur आरोपींकडून चोरीचा शेतमाल, एक चारचाकी कार आणि एक जुना वापरता मोबाइल असा एकूण ३ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी शिरपूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५, ३३४(१), ३०५(अ) व ३३४(१) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील आणि अपर पोलिस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर आडे, पोलिस उपनिरीक्षक निलेश जाधव, पोलिस हवालदार गजानन झगरे, आशिष बिडवे, ज्ञानदेव मात्रे, पोलिस अंमलदार अमोल ईरतकर, दिपक घुगे, गोपाल चौधरी तसेच चालक श्याम इंगळे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.या कारवाईमुळे शेतमाल चोरी करणार्यांचे धाबे दणाणले असून, शेतकर्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.