थायलंड-बालीला पर्याय ठरले व्हिएतनाम! हा लॉंग बेने पर्यटनविश्वाचे वेधले लक्ष

    दिनांक :29-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली, 
vietnam ha long bay परदेशात पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या पसंतीत आता मोठा बदल होताना दिसत आहे. थायलंड आणि बालीसारख्या लोकप्रिय पर्यटनस्थळांना मागे टाकत व्हिएतनाममधील 'हा लॉंग बे' हे ठिकाण जगभरातील पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. व्हिएतनामच्या ईशान्य किनारपट्टीवर वसलेल्या या निसर्गरम्य परिसरात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सरकारीआकडेवारीनुसार, अवघ्या दहा महिन्यांत जवळपास ३० लाख पर्यटकांनी या ठिकाणाला भेट दिली. यातून सुमारे ७०० अब्ज व्हिएतनामी डाँग म्हणजेच भारतीय चलनानुसार अंदाजे २.३ अब्ज रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. एकूण पर्यटकांपैकी सुमारे ६५ टक्के पर्यटक परदेशातून आले असून, जागतिक पर्यटन नकाशावर हा लॉंग बेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

vietnam ha long bay 
 
निसर्गसौंदर्य आणि साहसी पर्यटनाचा अनोखा संगम हे या ठिकाणाच्या लोकप्रियतेचे प्रमुख कारण आहे. सुमारे ६५ हजार ६५० हेक्टर क्षेत्रात विस्तारलेल्या या परिसरात समुद्राच्या निळ्याशार पाण्यातून उंचावलेली १ हजार ६०० हून अधिक चुनखडीची बेटे पर्यटकांना आकर्षित करतात. येथील प्राचीन गुहा, निसर्गनिर्मित रचना आणि समुद्रकिनाऱ्यांचे सौंदर्य पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येत आहेत. युनेस्कोने १९९४ मध्ये हा लॉंग बेचा जागतिक वारसास्थळांच्या यादीत समावेश केला. पारंपरिक लाकडी बोटी आणि आलिशान क्रूझमधून बेटांची सफर, कयाकिंग तसेच समुद्रावर अनुभवता येणारा सूर्यास्त हे पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरत आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांतच ६ लाख ८५ हजारांहून अधिक पर्यटकांनी या परिसराला भेट दिली.
भारतीय पर्यटकांमध्येही व्हिएतनामच्या या पर्यटनस्थळाची लोकप्रियता वाढत आहे. तुलनेने परवडणारा प्रवास, सुलभ ई-व्हिसा प्रक्रिया आणि भारतीय खाद्यपदार्थांचे उपलब्ध पर्याय यामुळे भारतीय कुटुंबे, जोडपी आणि एकल प्रवाशांसाठी हे ठिकाण पसंतीचे बनत आहे.vietnam ha long bay युरोपमधील पर्यटनस्थळांची आठवण करून देणारे निसर्गसौंदर्य आणि क्रूझ सफरीचा अनुभव तुलनेने कमी खर्चात मिळत असल्याने पर्यटकांचा ओढा वाढला आहे. त्यामुळेच व्हिएतनाममधील हा लॉंग बे आशियातील आघाडीच्या पर्यटनस्थळांमध्ये आपले स्थान मजबूत करत आहे.