हळदीच्या कार्यक्रमाला गेला अन् मृत्यूने गाठले! तरुणाची निर्घृण हत्या

    दिनांक :29-Nov-2026
Total Views |
पुणे,
pune murdered case तालुक्यातील नेवाळी येथे ३० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रोहित संजय ढोले असे मृत तरुणाचे नाव आहे. हत्येनंतर त्याची ओळख पटू नये, यासाठी मारेकऱ्यांनी चेहऱ्यावर ॲसिड टाकल्याची माहिती समोर आली आहे. गावाजवळील माळरानावर त्याचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कर्जत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
 
pune murdered case
 
 
 
रोहित हा नेवाळी गावात हळदी समारंभासाठी आला होता. कार्यक्रमानंतर रात्री तो अचानक बेपत्ता झाला. बराच वेळ होऊनही तो घरी परतला नसल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. त्याच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे शोध घेतला असता आवळस गावाजवळील माळरानावर त्याचा मृतदेह आढळून आला.
रोहितच्या शरीरावर मारहाणीच्या गंभीर खुणा आढळल्या आहेत. तसेच त्याचा चेहरा विद्रूप करण्यासाठी ॲसिडचा वापर करण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेत पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे.
रोहितची हत्या नेमकी कोणी केली, त्यामागे वैयक्तिक वाद होता की अन्य काही कारण, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. हत्येतील आरोपींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.pune murdered case या निर्घृण घटनेमुळे नेवाळी आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, कर्जत पोलीस सर्व शक्यतांचा विचार करून तपास करत आहेत