शेतात गांजाची लागवड; १५ किलो गांजा जप्त

२ लाख २६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

    दिनांक :03-Nov-2026
Total Views |
मानोरा,
cannabis-cultivation-in-a-field तालुयातील रतनवाडी येथील एका शेतात गांजाची लागवड केल्याचा प्रकार २ नोव्हेंबर रोजी उघडकीस आला. मानोरा पोलिसांनी कारवाई करून १५ किलो २२५ ग्रॅम गांजा जप्त केला असून, याप्रकरणी ७० वर्षीय शेतकरी नारायण किसन व्यवहारे यांना ताब्यात घेतले आहे.
 
 
cannabis-cultivation-in-a-field
 
मानोरा पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी नैना पोहेकर यांना रतनवाडी येथील शेतात गांजाची लागवड असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार सायंकाळी ५ वाजता कारंजा उपविभागीय पोलिस अधिकारी मनीष ठाकरे, ठाणेदार नैना पोहेकर आणि तहसीलदार राजेंद्र पाटील यांनी संबंधित शेतात छापा टाकला. यावेळी नारायण व्यवहारे यांच्या शेतात १५ किलो २२५ ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी तो जप्त केला. प्रतिकिलो १५ हजार रुपये दराने जप्त गांजाची किंमत २ लाख २६ हजार ५०० रुपये असल्याचे सांगण्यात आले. व्यवहारे यांना ताब्यात घेऊन मानोरा पोलिस ठाण्यात आणण्यात आले. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे, ठाणेदार नैना पोहेकर, फॉरेन्सिक लॅब पथक, पोलिस उपनिरीक्षक अनिल इंगळे, राधेश्याम महल्ले, रोहन तायडे, गोकुळ पांडुळे, सुषमा लोखंडे आणि चालक विजयसिंग राठोड यांनी केली.