चारचाकीची दुचाकीला धडक; एक जागीच ठार

    दिनांक :03-Nov-2026
Total Views |
मानोरा,
four-wheeler-hits-two-wheeler भरधाव चारचाकीने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात अजय विष्णू चौधरी (वय ३२ ) रा. आमगव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रकाश लांडे गंभीर जखमी झाले. ही घटना सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास मानोरा मार्गावर घडली.
 
 
four-wheeler-hits-two-wheeler
 
आमगव्हाण येथील अजय चौधरी आणि प्रकाश लांडे हे दोघे दुचाकीने फिरण्यासाठी मानोरा मार्गाने जात होते. दरम्यान, मंगरूळनाथकडून आर्णीकडे जाणार्‍या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत अजय चौधरी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर प्रकाश लांडे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच जमादार साहेबराव राऊत घटनास्थळी दाखल झाले. अजय चौधरी यांचा कृषी केंद्राचा व्यवसाय होता. आई-वडिलांचा ते एकुलते एक पुत्र होते. दोन वर्षांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता.