अनिल कांबळे
नागपूर,
city crime शहरात गेल्या काही महिन्यांपासून तडीपार आरोपींचा वावर वाढला आहे. गुन्हे शाखेची पथके आणि पोलिस ठाण्यातील डीबी पथके केवळ वसुलीवर भर देत गुन्हेगारांच्या हालचालींकडे लक्ष देत असल्याची चर्चा आहे. पोलिसांच्या निष्काळजी धोरणामुळे शहरातून तडीपार झालेले आरोपी शहरात मुक्तपणे फिरत आहेत. या प्रकाराकडे पोलिस आयुक्तांनी लक्ष देण्याची गरज आहे.
पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी गुन्हेगारी मुक्त शहराची संकल्पना मांडून नियोजन केले. गुन्हेगारांवर वचक राहावा यासाठी गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांना गस्त घालणे आणि ‘व्हिजिबल पोलिसींग’ चे धोरण आखून दिले. मात्र, गुन्हे शाखेतील काही कर्मचारी आणि डीबीतील काही कर्मचारी गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्याऐवजी वसुलीवर भर देत असल्यामुळेच तडीपार आरोपी शहरात फिरत असल्याची चर्चा आहे. एमआयडीसी पोलिसांनी नीलेश ऊर्फ गजनी शिलानाथ शाह (२८, रा. राजीवनगर वस्ती, शुभमनगर, एमआयडीसी) या तडीपार आरोपीला अटक केली.
गजनी हा पोलिस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. वारंवार प्रतिबंधक कारवाई करूनही तो गुन्हेगारीत सक्रीय असल्याने परिमंडळ क्र. १ च्या पोलिस उपायुक्तांनी त्याला एप्रिल २०२५ मध्ये जिल्ह्यातून दोन वर्षांकरित तडीपार केले होते. मात्र गजनी तडीपारीचे उल्लंघन करून शहरात परतला होता. रविवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास एमआयडीसी पोलिसांचे पथक ठाण्यांतर्गत गुन्हेगारांच्या शोधात गस्त घालत होते. या दरम्यान शुभमनगर झेंडा चौकाजवळ एक गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती हैदोस घालत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिस परिसरात पोहोचले असता गजनी लोकांना धमकावून शिविगाळ करताना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याचा गुन्हेगारी अभिलेख तपासला असता तो तडीपार असल्याचे समोर आले. पोलिसांनी तडीपारीच्या उल्लंघनासह विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून गजनीला अटक केली.
कोम्बिंग ऑपरेशनमध्ये तडीपार आरोपीला पकडले
शहरातून तडीपार करण्यात आलेले असतानाही विनापरवानगी नागपुरात वास्तव्य करणाऱ्या एका आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ६ च्या पथकाने कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान ताब्यात घेतले. आतिश ऊर्फ ऑस्टिन रॉबर्ट फ्रान्सिस (वय २८, रा. श्रीकृष्ण धाम झोपडपट्टी, सेक्टर क्रमांक १२, कोराडी) असे आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ६ च्या पथकाचे प्रमुख पीआय भरत कऱ्हा शहरात तडीपार आरोपींची वावर वाढला ! डे यांच्या पथकाने शहरात विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबविले. या मोहिमेदरम्यान तडीपार आरोपी, पाहिजे आरोपी तसेच गुन्हेगारांचा शोध घेतला जात होता.city crime यावेळी कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आतिश फ्रान्सिस आढळून आला. त्याची चौकशी केली असता, तडीपार असतानाही आवश्यक परवानगी न घेता तो नागपूर शहरात वास्तव्यास असल्याचे समोर आले. पथकाने त्याला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करून पुढील कारवाईसाठी कोराडी पोलिस ठाण्याच्या रात्रपाळी अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी कोराडी पोलिस तपास करीत आहेत.