भारत-न्यूझीलंड वनडेची वेळ ठरली!

    दिनांक :03-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली,
india-vs-new-zealand भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय क्रिकेट मालिकेला ४ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना ऑकलंड येथे खेळवण्यात येणार असून, भारतीय वेळेनुसार सकाळी ७.३० वाजता सामन्याला सुरुवात होईल. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना हा सामना पाहण्यासाठी सकाळी लवकर उठावे लागणार आहे.
 
india-vs-new-zealand
 
न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने यापूर्वी पाच सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका ३-२ अशा फरकाने जिंकली आहे. सुरुवातीचे सलग तीन सामने जिंकून भारताने मालिकेवर कब्जा मिळवला होता. मात्र, अखेरचे दोन सामने न्यूझीलंडने जिंकले. आता एकदिवसीय मालिकेतही विजयाची सुरुवात करण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.
 
पहिल्या एकदिवसीय सामन्याची नाणेफेक भारतीय वेळेनुसार सकाळी ७ वाजता होणार असून, त्यानंतर अर्ध्या तासाने म्हणजेच ७.३० वाजता प्रत्यक्ष खेळाला सुरुवात होईल. हा सामना ५० षटकांचा असल्याने तो साधारण दुपारी ३ वाजेपर्यंत संपण्याची शक्यता आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्या वेळेत मोठा फरक असल्यामुळे भारतीय प्रेक्षकांनी सामन्याच्या वेळेचे नियोजन करणे आवश्यक आहे.
 
या सामन्यासाठी न्यूझीलंडने हेन्री निकोल्स, विल यंग, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, जेकब डफी, नॅथन स्मिथ, मॅथ्यू फिशर, ब्लेअर टिकनर, टिम सेफर्ट आणि काईल जेमिसन यांचा संघात समावेश केला आहे. तर भारतीय संघात रोहित शर्मा, शुबमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अंशुल कंबोज, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार आणि नमन धीर यांचा समावेश आहे.