ओल्ड हायकोर्ट’ इमारतीच्या भींतीचा भाग कोसळला

- थोडक्यात बचावले मजूर

    दिनांक :03-Nov-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
old high court building शहरातील महत्त्वाच्या ऐतिहासिक व न्यायिक वारसा स्थळांपैकी एक असलेल्या जुन्या उच्च न्यायालयाच्या इमारतीच्या मागील बाजूचा काही भाग सोमवारी कोसळला. बांधकामाला दिलेला लाकडी बल्लीचा आधार काढल्यानंतर ही पडझड झाल्याची माहिती आहे. सुदैवाने या घटनेत काम करणाऱ्या मजुरांपैकी कोणालाही दुखापत झाली नाही. विशेष म्हणजे, इमारतीच्या नकाशाचा अभ्यास केल्यास कोसळलेला भाग मुख्य इमारतीचा नसून मागील बाजूला असलेल्या अतिक्रमित बांधकामाचा असल्याची चर्चा आहे. मात्र, या पडझडीमुळे मुख्य इमारतीच्या मागील भागालाही धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
 

old high court building 
 
 
जुन्या उच्च न्यायालयाच्या या ऐतिहासिक वास्तूची दुरवस्था लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून (सुओ मोटो) जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. या प्रकरणात नियमित सुनावणी घेत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाला आवश्यक कार्यवाहीसाठी सक्रिय करण्यात आले.old high court building त्यानंतर वास्तूच्या संवर्धनाचे काम सुरू झाले. संवर्धनाच्या कामाला गती देण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने इमारतीचा संपूर्ण परिसर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित केला असून, या परिसरात काम सुरू असताना मजुरांनी मागील बांधकामाला दिलेला बल्लीचा आधार काढला. त्यानंतर अतिक्रमित भाग कोसळल्याचे सांगण्यात येत आहे.