डॉ. सुरेंद्र शेजे यांच्या शतदा प्रेम करावे देवगाणी कार्यक्रमाने बुलढाणेकर मंत्रमुग्ध

    दिनांक :03-Nov-2026
Total Views |
बुलढाणा
shatada-prem-karave स्वर साधना संगीत विद्यालय व स्वरविहार संगीत विद्यालय, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संगीतकार पं.यशवंत देव यांच्या जन्मशताब्दी निमित्त ज्येष्ठ संगीत अभ्यासक प्रा.डॉ. सुरेंद्र शेजे यांच्या संकल्पनेतील यशवंत देवांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचा शतदा प्रेम करावे हा अजरामर देवगाणींचा कार्यक्रम गोवर्धन हॉल, बुलढाणा सायंकाळी ६ वाजता संपन्न झाला
 
bul
कार्यक्रमाची सुरुवात जेष्ठ संगीतज्ञ अरविंद टाकळकर,कर्नल सुहास जतकर, मालती शेळके,संदीप शेळके,पत्रकार रणजितसिंग राजपूत यांच्या हस्ते पं.यशवंत देव यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आली.यावेळी प्रा.डॉ.सुरेंद्र शेजे यांनी पंडित यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेली प्रसिद्ध गीते भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी, येशील येशील राणी पहाटे पहाटे, स्वर आले दुरुनी हि गीते सादर केली तर सहगायक म्हणून प्रा.रविकिरण मोरे यांनी या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, दिवस तुझे हे फुलायचे,दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे या गीतांवर प्रेक्षकांची दाद मिळविली.तर कविता वरघट यांनी गणनायका शुभदायका,माझी रेणुका माऊली, जीवनात हि घडी अशीच राहू दे आदी देवगाणींचे भावपूर्ण सादरीकरण करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.या कार्यक्रमात श्रीकांत ढवळे, गणेश भालतिलक, हरीश लांडगे आणि तबल्यावर अमोल दिशागज यांनी साथसंगत केली.मैफिलीचे साजेशे निवेदन रविकिरण टाकळकर यांनी केले, निषाद टाकळकर व वैशाली मोरे यांनी यांनी केले. बुलढाण्यातील शेकडो रसिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला.