वाशीम,
strengthening-water-conservation जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीवर मात करून जलसुरक्षा, कृषी उत्पादकता आणि ग्रामीण कुटुंबांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. विदर्भ जल संवर्धन कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासन आणि वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (डब्ल्यूओटीआर) यांच्यात ३० ऑटोबर रोजी सामंजस्य करार करण्यात आला.या करारावर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, तर डब्ल्यूओटीआरच्या वतीने संस्थेचे कार्यकारी संचालक प्रकाश केसकर यांनी स्वाक्षर्या केल्या.

मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता हरेंद्र वाघमारे, प्रादेशिक व्यवस्थापक शरद भनगडे, प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण वरकर व विजय बनसोडे, तसेच एचडीएफसी बँकेचे समूह प्रमुख राजकुमार पोजगे आणि जिल्हा व्यवस्थापक राम शर्मा यांची उपस्थिती होती. विदर्भ जल संवर्धन कार्यक्रमाचा उद्देश नैसर्गिक संसाधनांचे पुनरुज्जीवन, शेतीची उत्पादकता वाढविणे आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी बळकट करून ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावणे हा आहे. विदर्भातील सात जिल्ह्यामधील नऊ तालुयातील ५३५ गावांमध्ये हा कार्यक्रम राबविण्याचे नियोजन आहे. यामध्ये ३५० गावामध्ये शासनाच्या विविध योजनांच्या अभिसरणातून, तर १८५ गावामध्ये एचडीएफसी परिवर्तनच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत. वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुयात या कार्यक्रमांतर्गत एचडीएफसी परिवर्तनच्या सहकार्याने २० गावांची निवड करण्यात आली आहे. या गावामधील ६ हजार ८२८ कुटुंबांतील ३१ हजार २९१ नागरिकांना या प्रकल्पाचा लाभ अपेक्षित आहे.
कार्यक्रमाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी त्रैमासिक किंवा सहामाही बैठका घेण्यात येणार आहेत. सामंजस्य कराराचा कालावधी तीन वर्षांसाठी आहे. जलसंधारण, शेतीतील सुधारित पद्धती आणि पूरक उपजीविकेच्या संधी यांची सांगड घालून गावांची पाणी उपलब्धता वाढविणे, पडीक जमीन लागवडीखाली आणणे, सिंचन क्षेत्राचा विस्तार करणे आणि ग्रामीण कुटुंबांचे उत्पन्न स्थिर व शाश्वत करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.