मुंबई,
Trolingla Pankaja Mundenchan Rokhthok North मुंबईतील ग्रँड हयात येथील एका फॅशन विक कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडे यांनी रॅम्प वॉक केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ‘बॉम्बे टाइम्स फॅशन वीक’मध्ये जालना जिल्ह्यातील शेतकरी महिलांनी तयार केलेल्या ‘जालनाई’ साडीचे प्रमोशन करण्यासाठी मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या रॅम्प वॉकवरून सध्या मोठे राजकारण तापले आहे.विरोधकांनी दुष्काळाचे कारण देत त्यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच सरकारला दुष्काळाचे गांभीर्य नसल्याचा आरोप करत त्यांनी मंत्र्यांच्या वैयक्तिक खर्चाचा मुद्दा उपस्थित केला. सरकारने शेतकर्यांना पाच हजार रुपये दिले आहेत, मग पंकजा मुंडे यांनी रॅम्प वॉक केला तर त्यात गैर काय, असा उपरोधिक सवाल त्यांनी केला.

दरम्यान फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक केलं म्हणून होणाऱ्या ट्रोलिंगला पंकजा मुंडे यांनी रोखठोक उत्तर दिलं आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या की, “जालना जिल्ह्याच्या दुष्काळी दौऱ्यावर आहे. जालन्याच्या सिल्क ला राज्यभरात नेण्याचा प्रयत्न,महिलांना रोजगार दिला. महिलांसाठी हा प्रयोग, जालना हा एक नंबर आहे. मार्केट मुंबई नाही तर संपूर्ण देशात मिळावे.रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न आहे. रॅम्प वॉक वर जी टीका झाली,दोन विरोधी पक्षातील नेत्यांनी टिप्पणी केली, 24 वर्षीय मुलाची आई आहे, राजकारणात 22 वर्ष पासून सक्रिय असून ग्रामीण महिलांना न्याय देण्यासाठी प्रयत्न होता. महिलांच्या कामाला ओळख मिळावी यासाठी मुंबईत आमच्या महिलांच्या साड्यांचे स्टॉल लागले, मला रॅम्प वॉक करण्याची हौस नाही,मला महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करावा लागेल तर परत करेल, जालन्यातील साडी मुंबईतील महिला विकत घेत असेल तर तो पैसा जालनाच्या महिलेच्या खिशात जाईल.”