परस्परविरोधी तक्रारींवरून गुन्हे दाखल
मालेगाव,
solar-plant-in-kherdi मालेगाव तालुयातील खेर्डी येथे सोलार प्लांटवरील सुरक्षा रक्षकांच्या ड्युटीवरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर दोन गटातील तुफान हाणामारीत झाले. या घटनेत दोन्ही बाजूकडून लाठ्या, बांबूच्या काठ्या आणि लोखंडी रॉडने एकमेकावर हल्ला करण्यात आला. या मारहाणीत दोन्ही गटातील अनेक जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी दोन्ही बाजूच्या परस्परविरोधी तक्रारींवरून मालेगाव पोलिसांनी अपराध क्रमांक ६४२/२०२६ आणि ६४३/२०२६ असे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिसात दाखल पहिल्या तक्रारीनुसार, १ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास सोलार प्लांटवरील सुरक्षा रक्षकांच्या ड्युटी बदलण्यावरून आदित्य आंधळे आणि सोनू कालापाड यांच्यात वाद झाला. आदित्यची सकाळी ८ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत ड्युटी होती. ड्युटी संपल्यानंतर तो घरी परतला. त्यावेळी नाईट शिफ्टसाठी येणार्या सोनू कालापाड याने घरी जाऊन ड्युटी सोडून आल्याबद्दल जाब विचारला. त्यातून दोघामध्ये शाब्दिक वाद व शिवीगाळ झाली. तक्रारदार ज्ञानेश्वर आंधळे यांच्या म्हणण्यानुसार, हा वाद वाढल्यानंतर सोनू कालापाड हा वडील देविदास, संदीप, वसंता यांच्यासह कुटुंबातील अन्य सदस्यांना घेऊन हातात काठ्या घेऊन त्यांच्या घरासमोर आला. यावेळी झालेल्या मारहाणीत करण आंधळे याच्या डोयावर काठीने वार करण्यात आला. तसेच जगन्नाथ आंधळे, कविता आंधळे आणि नवनाथ आंधळे हेही जखमी झाले. या प्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, दुसर्या गटातील वसंता कालापाड यांनीही पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, ड्युटीच्या समायोजनावरून झालेल्या वादानंतर हनुमान मंदिरासमोर आंधळे कुटुंबातील काही जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी करण आंधळे याने बांबूच्या काठीने त्यांच्या डोयावर वार केल्याचा आरोप आहे. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या पत्नी पूजा यांना धक्काबुक्की करून खाली पाडण्यात आले व त्यांच्या पायावर काठीने मारहाण करण्यात आली. तसेच सोनू कालापाड याच्या डोयावर लोखंडी रॉडने वार केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या मारहाणीत पूजाच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची पोत तुटून पडल्याचेही त्यांनी म्हटले आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना ग्रामीण रुग्णालय, मालेगाव येथे दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर काही जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशीम येथे पाठविण्यात आले. दोन्ही बाजूंच्या तक्रारींवरून मालेगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. ठाणेदार राजेश खेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ सचिन कल्ले व पोकॉ रवि खडसे पुढील तपास करीत आहेत.