बुलढाणा
sainik-school सैनिक शाळांमध्ये इयत्ता सहावी आणि नववीत प्रवेश घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने प्रवेशपूर्व परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. देशातील केंद्र सरकारच्या अखत्यारीतील ३३ सैनिक शाळांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या ८० नवीन सैनिक शाळांमध्ये प्रवेशाची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे देशातील एकूण ११३ सैनिक शाळांमध्ये प्रवेशाचा मार्ग खुला झाला आहे.
राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या वतीने ३ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रवेश प्रक्रियेची घोषणा करण्यात आली. त्यानुसार, इयत्ता पाचवी आणि आठवीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे सहावी आणि नववीत प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे, नियमित अर्ज प्रक्रिया ३ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२६ रोजी रात्री ११.५० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर विलंब शुल्कासह ३ ते ६ डिसेंबरदरम्यान अर्ज करता येईल. अर्जातील त्रुटी अथवा बदल करण्यासाठी ७ ते ९ डिसेंबर हा कालावधी निश्चित करण्यात आला०आहे. प्रवेशपूर्व परीक्षेचे केंद्र ११ जानेवारी २०२७ रोजी जाहीर होणार असून, २५ जानेवारी रोजी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे.
प्रत्यक्ष परीक्षा ३१ जानेवारी २०२७ रोजी घेतली जाणार आहे. ही परीक्षा एमसीयू पद्धतीने पेन आणि पेपर स्वरूपात ओएमआर उत्तरपत्रिकेवर होईल.०इयत्ता सहावीसाठी परीक्षेचा कालावधी १५० मिनिटे असून, प्रश्नपत्रिका १३ भाषांमध्ये उपलब्ध असेल. तर इयत्ता नववीसाठी १८० मिनिटांची परीक्षा असून, ती इंग्रजी माध्यमातून घेतली जाणार आहे.
प्रवेश प्रक्रिया, पात्रता, अर्ज आणि परीक्षेसंदर्भातील सविस्तर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या या अधिकृत संकेतस्थळांना भेट द्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे.