अखिलेश यादव यांचा सर्वात मोठा राजकीय धमाका

विधानसभा निवडणूक लढवणार नाही, थेट मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

    दिनांक :04-Nov-2026
Total Views |
लखनौ,
akhilesh-yadav समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी 2027 मध्ये होणारी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक आपण लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. आपण थेट मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मंगळवारी अखिलेश यादव वाराणसी दौऱ्यावर आले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना काशीतील कोणत्याही विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार का, असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी 2027 मध्ये आपण स्वतः विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले. आपल्यासाठी जे शुभ आहे, तेच आपण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
 
akhilesh-yadav
 
‘थेट मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार’
माध्यमांशी बोलताना अखिलेश यादव म्हणाले की, आम्ही निवडणूक लढवत नाही, तेव्हाच मुख्यमंत्री बनतो. यावेळी त्यांनी, मागच्या वेळी मी कुठून मुख्यमंत्री झालो होतो, ते सांगा? लोकसभेतून... त्यामुळे यावेळीही तिथूनच येऊन मुख्यमंत्रीपदाची शपथ घेईन, असे म्हटले.
 
 
2012 मध्ये अखिलेश यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा ते कन्नौजचे खासदार होते. त्यावेळी ते उत्तर प्रदेश विधानमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. विधान परिषद निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचे वक्तव्य समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मंगळवारी वाराणसी विधान परिषदेच्या दोन्ही जागांवर समाजवादी पक्षाच्या उमेदवारांचा झालेला विजय हा बाबा विश्वनाथांचा आशीर्वाद असल्याचे म्हटले. वाराणसीतील समाजवादी पक्षाचे सक्रिय पदाधिकारी राजेश यादव यांचे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष सतीश फौजी यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अखिलेश यादव वाराणसीत आले होते.