मुंबई,
amul-ghee-butter-price-hikeऐन सणासुदीच्या दिवसात विशेषत: दिवाळी फराळची तयारी जोरात सुरू असताना दुसरीकडे अमूलने ग्राहकांच्या बजेटवर सर्जिकल स्ट्राइक केला आहे. अमूलने तूप आणि लोणी दरात मोठी वाढ केली आहे.आधीच महागाईमध्ये होरपळणाऱ्या सामान्य ग्राहकांना झटका लागला आहे. अमूलने दिवाळीपूर्वी तूप आणि बटरच्या दरात मोठी वाढ जाहीर करून ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. कंपनीने १ किलो तुपाच्या पाकिटावर थेट ५० रुपयांची वाढ केली आहे, तर ५०० ग्रॅम बटरचे पाकीट १५ रुपयांनी महागले आहे. विशेष म्हणजे, दर वाढण्यासोबतच बाजारात अमूलच्या गाईच्या तुपाचा मोठा तुटवडा जाणवत आहे.
१ किलो तूप कार्टनसाठी पूर्वी ६३० रुपये मोजावे लागत होते. आता १ किलो तुपाचा पॅक आता ६८० रुपयांना मिळणार आहे. तर, ५०० ग्रॅम शुद्ध तूपाचा (पाऊच) दर ३२५ रुपयांवरून वाढवून आता ३४५ रुपये करण्यात आले आहे. १०० ग्रॅम बटरचा ६३ रुपयांवरून ६६ रुपये झाला आहे. ५०० ग्रॅम बटरचा दर हा ३१० रुपयांवरून ३२५ रुपये झाला आहे.