नागपूर,
asha-parekh-koradi-temple-visitहिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ व सुप्रसिद्ध अभिनेत्री पद्मश्री आशा पारेखजी यांनी आज कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिराला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी आई जगदंबेचे मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
मंदिर संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी आशा पारेखजी यांचे पुष्पगुच्छ देऊन आत्मीयतेने स्वागत व सत्कार केला. यावेळी मंदिर परिसरातील भव्यता, स्वच्छता, सुंदरता आणि भाविकांसाठी करण्यात आलेल्या विविध सोयी-सुविधांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
आई जगदंबेच्या दर्शनानंतर त्यांनी मंदिर परिसराच्या सुंदरतेबद्दल आपले मनोगत व्यक्त करत समाधान व्यक्त केले. त्यांच्या या सदिच्छा भेटीमुळे मंदिर संस्थानच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. याप्रसंगी मंदिर संस्थानचे पदाधिकारी व संबंधित मान्यवर उपस्थित होते.