आयुष्मान खुरानालाही धमकी! लॉरेन्स गँगच्या नावाने कोट्यवधींची खंडणी मागितल्याचा दावा

ऑडिओ क्लिपमुळे खळबळ

    दिनांक :04-Nov-2026
Total Views |
मुंबई
ayushmann khurrana टायगर श्रॉफ गोळीबारात प्रकारणानंतर बॉलिवूड कलाकारांना बिश्नोई गँगच्या नावाने येणाऱ्या धमक्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीय. अभिनेता सलमान खान, तुषार कपूर पाठोपाठ आता अभिनेता आयुष्मान खुरानाला लॉरेन्स गँगच्या नावाने धमकीचा ऑडिओ मेसेज आल्याची माहिती समोर आल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
 

ayushmann khurrana receives threat in lawrence bishnoi gang 
मिळालेल्या माहितीनुसार, आयुष्मान खुरानाला एका अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा ऑडिओ मेसेज पाठवण्यात आला. या ऑडिओमध्ये संबंधित व्यक्तीने स्वतःचा संबंध लॉरेन्स बिश्नोई गँगशी असल्याचा दावा केला आहे. तसेच अभिनेत्याकडे कोट्यवधी रुपयांची खंडणी मागितल्याचे सांगितले जात आहे.
धमकी देणाऱ्याच्या आवाजाची पडताळणी सुरू असून कॉलची कसून चौकशी पोलीस करत आहेत. या धमकीच्या मेसेजमुळे सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत.
कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
बॉलिवूड सेलिब्रिटी सध्या मोठ्या दहशतीखाली आहेत. कारण अभिनेता सलमान खान याच्यानंतर अनेक सेलिब्रिटींना जीवे मारण्याची आणि खंडणीसाठी कॉल आणि ईमेल येत आहेत. अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराची घटना आणि त्यानंतर आयुष्मान खुराना, तुषार कपूर यांना मिळालेल्या धमक्यांमुळे बॉलिवूडमधील कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.कलाकारांना धमक्या देऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती किंवा टोळीचा पोलीस शोध घेत आहेत. या सर्व घटनांमागे एकच टोळी आहे का, धमक्या देणारे खरोखरच गँगशी संबंधित आहेत का आणि खंडणी मागण्यामागे नेमका काय उद्देश आहे, याचा तपास सुरू आहे.