कन्हेर नदीचा कहर; पिता-पुत्राचा मृत्यू!

    दिनांक :04-Nov-2026
Total Views |

धुळे,
dhule-kanher-river-flood-deathsधुळे तालुक्यात झालेल्या 31 जुलै रोजी अतीवृष्टीमुळे आंबोडे व संपूर्ण परिसरात प्रचंड पूरस्थिती निर्माण झाली होती. आंबोडे, भिरडाई, भिरडाणे, चिंचखेडे, नंदाळे आणि वणी या गावांमधील जुने के.टी. वेअर फुटल्यामुळे कन्हेर नदीला महापूर आला होता. या पुराचे पाणी गावात शिरल्यामुळे अनेक घरांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले आहे. ​
 
kanher nadi
 
 
या नैसर्गिक आपत्तीदरम्यान आंबोडे येथील शिवसेनेचे ज्येष्ठ शिवसैनिक कै. आनंदा भागवत पारखे आणि त्यांचा मुलगा कै. दिनेश आनंदा पारखे या नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अद्याप त्यांचे मृतदेह सापडलेले नाहीत. तसेच गावातील अनेक शेतकऱ्यांची शेती व 224 लोकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले असून अद्याप कोणतीही शासकीय मदत मिळालेली नाही.
 
या गंभीर प्रकारची दखल घेऊन शिवसेना पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, मृतांच्या वारसदारांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी आणि नुकसानग्रस्त ग्रामस्थ व शेतकऱ्यांना लवकरात लवकर योग्य मोबदला देऊन पुनर्वसन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.