जिल्ह्यातील १२ हजार ६२ शेतकर्यांच्या खात्यात १२९ कोटी ७५ लाख जमा

१३ हजारांहून अधिक शेतकर्यांचे आधार प्रमाणीकरण प्रलंबित

    दिनांक :04-Nov-2026
Total Views |

वर्धा,
farmer-loan-waiver-updateपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील ७२ हजार ७१० शेतकर्यांची यादी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी ६० हजार ८३० शेतकर्यांची खाती कर्जमाफीसाठी पात्र ठरली असून त्यांना आधार प्रमाणीकरणासाठी संदेश पाठविण्यात आले आहेत. आज ४ नोव्हेंबर रोजी शासनाने १२ हजार ६२ शेतकर्यांच्या खात्यात १२९ कोटी ७५ लाख रुपये जमा केले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ४४ हजार १५१ शेतकर्यांच्या खात्यात ४४१ कोटी ८६ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.
 

wardha 
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत पात्र शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. पोर्टलवर पात्र ठरलेल्या ६० हजार ८३० शेतकर्यांपैकी १३ हजार ५७७ शेतकर्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप प्रलंबित आहे. पात्र शेतकर्यांनी आपले आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे.
 
कर्जमाफीसाठी पात्र शेतकर्यांची यादी तहसील कार्यालये, सहायक निबंधक कार्यालयं तसेच ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी तलाठ्यांकडेही उपलब्ध आहे. ज्यांना आधार प्रमाणीकरणासाठी मोबाईलवर संदेश प्राप्त झाला आहे, त्यांनी आधार कार्ड आणि अॅग्री स्टॅक क्रमांकासह आपले सरकार सेवा केंद्र किंवा सीएससी केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. त्यानंतर आधार, बँक खाते अथवा रक्कम यांची वैधता निश्चित केली जाईल.
 
सीएससी केंद्रावर आधार प्रमाणीकरण करताना शेतकर्यांनी आपला विशिष्ट क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. ज्या शेतकर्यांचे निधन झाले आहे, त्यांच्या वारसांनी संबंधित बँक शाखेत जाऊन मृत्यूची नोंद करून घ्यावी. त्यानंतर बँकेच्या नियमानुसार आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी. मृत शेतकर्यांच्या आधार अमान्यतेची माहिती डीएलसीकडे पाठविण्यात येणार आहे. तसेच सर्व ई-सेवा चालकांना शेतकर्यांचे आधार प्रमाणीकरण विनामूल्य करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
 
नंतरच खात्यात पैसे
आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित पात्र शेतकर्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या यादीत नाव असलेल्या सर्व पात्र शेतकर्यांनी सीएससी किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. जेणेकरून योजनेचा लाभ मिळण्यास पात्र ठरता येईल, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.