नागपूर,
gold-price-fall-2026गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण होताना दिसत आहे. भारतात ऐन दिवाळीच्या तोंडावर सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झाली. काही महिन्यांपूर्वी सोन्याचा भाव थेट 2 लाखाच्या आसपास पोहोचला होता. सोने खरेदीही अवाक्याबाहेर गेली. त्यानंतर सोन्याचे भाव अजून वाढतील, असा अंदाज होता. पण प्रत्यक्षात सोन्याचे भाव कोसळताना दिसत आहेत.
इराण आणि अमेरिका युद्धापूर्वी सोन्याचे भाव प्रचंड वाढले होते. पण युद्धाला सुरूवात झाली आणि सोने कोसळले. जागतिक बाजारातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोन्याचा दरात घसरत होत आहे. 2026 मध्ये आतापर्यंत सोन्याच्या किंमती या 8 टक्क्याहूंन अधिक घसरल्या आहेत. पुढील काही काळात अजून सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण होण्याची शक्यता आहे. जागतिक ब्रोकरेज नोमुराच्या ताज्या रिपोर्टनुसार, सोन्याचा भाव प्रती औंस 3,500 डॉलरने खाली येऊ शकतो.
भारतात सध्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1.39 लाख रूपये झाला. 11 टक्क्यांनी घसरण झाली असून सोने प्रती 10 ग्रॅम 15,290 रूपयांनी स्वस्त झाले. हेच नाही तर भारतात सोन्याचा दर 1.23 लाख रूपये प्रती 10 ग्रॅमपर्यंत सोने खाली येऊ शकते. तज्ज्ञ जतिन त्रिवेदी यांनी म्हटले की, बाजारात नफावसुलीमुळे सोन्यावर मोठा दबाव आहे. अमेरिकेतील निवडणुकावरही काही गोष्टी अवलंबून आहेत.
पुढील सहा ते सात दिवसात भारतीय बाजारपेठेत सोने आणि चांदीची मोठी उलाढाल होईल. दिवाळीच्या तोंडावर भारतात मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली जाते. त्यातच सोन्याच्या किंमतीमध्ये झालेली घसरण ज्यानंतर सोने खरेदी अधिक केली जाईल. पुढील काही दिवसात सोन्याचे भाव अधिक घसरतील, असा अंदाज तज्ज्ञांचा आहे. ही सोन्याच्या भावात अत्यंत मोठी घसरण असणार आहे.