कारंजा लाड,
karanja-lad कारंजा व मानोरा तालुयातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना अनुषंगाने सज्ज असावे असे प्रतिपादन आमदार सई प्रकाश डहाके यांनी दोन्ही तालुयातील अधिकार्यांच्या आढावा बैठकीत केले. २ नोव्हेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात तालुयातील सद्यस्थितीतील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा, पाणीटंचाई व जनावरांच्या चारा टंचाईबाबत अधिकार्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

या आढावा बैठकीला आमदार सई डहाके,देवव्रत डहाके,उपविभागीय अधिकारी कैलास देवरे,कारंजा तहसीलदार रवी महाले,मानोरा तहसीलदार राजेंद्र पाटील,गटविकास अधिकारी पुनम राणे,कृषी अधिकारी अश्विनी भोसले, पशुधन विकास उपायुक्त डॉ.रवी ठाकरे तथा विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.आढावा बैठकीत आय.डहाके यांनी संबंधित विभागांच्या अधिकार्यांकडून दुष्काळ संदर्भातील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपाय योजनांचा सविस्तर आढावा घेतला.यावेळी गावनिहाय पाणीटंचाई, टँकरद्वारे पाणीपुरवठा, उपलब्ध पाणीसाठा आणि जनावरांसाठी चार्याची उपलब्धता यावर चर्चा करून आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.संकटाच्या काळात नागरिक आणि शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा, कोणत्याही गावात पाणी व चार्याची टंचाई भासू नये, यासाठी प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही करावी, यामध्ये कुणीही कुचराई करता कामा नये.जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी आणि संकटसमयी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याच्या सुचना त्यांनी उपस्थित अधिकार्यांना दिल्या.
आढावा बैठकीत आ. डहाके यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्याकडून दुष्काळ संदर्भातील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपाय योजनांचा सविस्तर आढावा घेतला.यावेळी गावनिहाय पाणीटंचाई, टँकरद्वारे पाणीपुरवठा, उपलब्ध पाणीसाठा आणि जनावरांसाठी चार्याची उपलब्धता यावर चर्चा करून आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या तसेच परिस्थितीचा आढावा घेतला.