सौरभ चंद्राकरला आठ दिवसांची कोठडी

    दिनांक :04-Nov-2026
Total Views |

रायपूर,
mahadev-betting-cbi-custodyमहादेव ऑनलाईन बेटिंग ॲप प्रकरणातील आरोपी सौरभ चंद्राकरला बुधवारी रायपूर येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने चंद्राकारला आठ दिवसांची सीबीआय कोठडी मंजूर केली. या कालावधीत, सीबीआय ११ नोव्हेंबरपर्यंत चंद्रकरची चौकशी करेल. या चौकशीतून प्रकरणाशी संबंधित महत्त्वपूर्ण खुलासे होऊ शकेल, अशी अपेक्षा तपास यंत्रणेला आहे.

sautabh 
 
सीबीआय कोठडीचा कालावधी संपल्यानंतर १२ नोव्हेंबरला चंद्राकरला पुन्हा न्यायालयात हजर केले जाईल. सुरक्षेच्या कारणास्तव सीबीआय आरोपीला रायपूरऐवजी चौकशीसाठी दिल्लीला नेण्याची तयारी करत आहे. दरम्यान, अंमलबजावणी संचालनालयाने देखील चंद्राकरच्या कोठडीसाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
 
विशेष म्हणजे, सौरभ चंद्राकरला आठ जुलैला ओमानच्या रॉयल पोलिसांनी रेड कॉर्नर नोटीसच्या आधारे अटक केली. यानंतर, सीबीआय आणि ईडीने भारत सरकारमार्फत ओमानला औपचारिक प्रत्यार्पणाचा प्रस्ताव पाठवला. अनियमिततेशी संबंधित सर्व पुरावे ओमानच्या पोलिसांनाही देण्यात आले. भारत सरकारची एजन्सी, इंटरपोल आणि ओमानच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर प्रत्यार्पणाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर सीबीआयचे पथक ओमानची राजधानी मस्कत येथे गेले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, हे पथक एक नोव्हेंबरला चंद्राकरसोबत भारतात दाखल झाले.