मुंबई,
maharashtra-cabinet-12-decisionsमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विविध विभागांशी संबंधित एकूण 12 निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांमुळे वाहनधारक, विद्यार्थी, शेतकरी, पशुपालक तसेच सहकारी संस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे. वाहनांवरील प्रलंबित दंड भरण्यासाठी अभय योजना लागू करण्यापासून ते विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात वाढ करण्यापर्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांच्या इंटर्नशिप भत्त्यात वाढ
पशुवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या इंटर्नशिप भत्त्यामध्ये वाढ. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत पशुवैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा. ग्रामीण भागातील पशुचिकित्सालयाच्या ठिकाणी सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळणार. पशुधनाची काळजी घेण्यासाठी शेतकऱ्यांना, पशुपालकांना मदत होणार.
1. वाहनधारकांसाठी अभय योजना
3. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात वाढ
4. पालघर जिल्ह्यात तीन ग्राम न्यायालये
5. मुखेडमध्ये वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय
6. बिडगाव-तरोडी नगर पंचायतीला जमीन
7. गोंदियातील घरांसाठी दिलेल्या जमिनींचे विनामूल्य रूपांतरण
8. सिद्धिविनायक मंदिर न्यासाला मुद्रांक शुल्क माफी
9. हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट विद्यापीठाच्या नियमांत बदल
10. नागपुरात आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र
11. 18 सहकारी संस्थांवर प्रशासक नियुक्ती होणार नाही
12. मोठ्या सहकारी संस्थांच्या संचालक मंडळावर पाच सदस्यांची नियुक्ती