पुणे,
maharashtra-farmer-loan-waiver-2026पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत आज राज्यातील ४ लाख ८७ हजार पात्र शेतकरी लाभार्थ्यांच्या बँक खात्यांत ४ हजार ७६५ कोटी रुपयांची कर्जमुक्तीची रक्कम थेट जमा करण्यात येत आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्यामुळे आज अखेर आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या तब्बल २० लाख ७२ हजार पात्र शेतकऱ्यांना एकूण १८ हजार ४० कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीचा थेट लाभ मिळाला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील १२ हजार ८८६ शेतकऱ्यांना ७८.९४ कोटी रुपयांचा लाभ मिळाला असून, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित करण्यात आलेल्या आणि ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या तसेच ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेल्या पीक कर्ज आणि पुनर्गठित अथवा फेरपुनर्गठित कर्जासाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येत आहे. योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असून, यासाठी शासनाने महाआयटीची नियुक्ती केली आहे.
महाआयटीने विकसित केलेल्या योजना पोर्टलवर बँकांकडून एकूण ३१.१७ लाख थकीत कर्जखात्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. यापूर्वी आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या १५.८५ लाख पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये १३ हजार २७५ कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. आता आणखी ४.८७ लाख पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ४ हजार ७६५ कोटी रुपये जमा करण्यात येत आहेत. अशा प्रकारे आतापर्यंत एकूण २०.७२ लाख पात्र शेतकऱ्यांना १८ हजार ४० कोटी रुपयांचा कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येत आहे. पात्र शेतकरी लाभार्थी आणि त्यांना मिळणाऱ्या लाभाच्या रकमेची विभाग व जिल्हानिहाय चौकशी यादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महाआयटीतर्फे २५.८२ लाख पात्र शेतकऱ्यांची यादी
महाआयटीमार्फत संगणकीय प्रक्रियेद्वारे करण्यात आलेल्या तपासणीनुसार, आतापर्यंत चार वेगवेगळ्या याद्यांद्वारे एकूण २५ लाख ८२ हजार ८२७ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यातील यादीत १६ लाख ९६ हजार २०१, दुसऱ्या यादीत ४ लाख १९ हजार ७३७, तिसऱ्या यादीत ३ लाख ५१ हजार १९२ आणि चौथ्या यादीत १ लाख १५ हजार ६९७ शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. वरील बातमीला चांगली प्रभावी हेडलाईन आणि सब हेडलाईन तयार करूनदे