समता नगर, बाबादीप नगर परिसरात अंधाराचे साम्राज्य अन् खडतर रस्ते

हापालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त

    दिनांक :04-Nov-2026
Total Views |

नागपूर,
north-nagpur-civic-issuesउत्तर नागपूर क्षेत्रातील आशी नगर झोन अंतर्गत येणाऱ्या समता नगर, बाबादीप नगर आणि आदिवासी ले आउटसह परिसरातील अनेक वस्त्यांमध्ये नागरिकांना मूलभूत सुविधांअभावी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परिसरात पथदिवे बंद असल्यामुळे पसरणाऱ्या अंधारासोबतच, रस्त्यांची झालेली दुर्दशा आणि खड्ड्यांमुळे स्थानिक रहिवाशांचे जगणे बेहाल झाले आहे.
 

nagpur 
या परिसरातील अनेक वस्त्यांमध्ये अजुनही पक्के रस्ते तयार करण्यात आलेले नाहीत. ठीकठिकाणी पडलेले मोठे खड्डे आणि कच्च्या रस्त्यांमुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या खडतर व खड्डेमय रस्त्यांमुळे विशेषतः वयोवृद्ध नागरिक, महिला आणि लहान मुलांना ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तसेच अंधारात हे खड्डे न दिसल्याने रोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. याशिवाय, समता नगर पुलाजवळ प्रशासनाकडून बसवण्यात आलेल्या दोन हायमास्ट लाईटपैकी एक हायमास्ट पूर्णपणे बंद असून दुसऱ्यावर केवळ दोनच दिवे सुरू आहेत. गल्लीबोळांतील पथदिवेही बंद असल्याने संपूर्ण परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. या परिस्थितीचा फायदा घेत चोऱ्या व असामाजिक तत्त्वांचा उपद्रव वाढला असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.