अतिवृष्टीग्रस्तांसाठी आ. अग्रवाल यांचा यशस्वी पुढाकार

९० लाख रुपयांचा निधी मंजूर, दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त कुटुंबांच्या बँक खात्यांत जमा होणार मदतीची रक्कम

    दिनांक :04-Nov-2026
Total Views |
गोंदिया
mla-agrawal नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना दिलासा मिळवून देण्यासाठी आमदार विनोद अग्रवाल यांनी शासन स्तरावर सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश आले असून, गोंदिया विधानसभा क्षेत्रातील नुकसानग्रस्त कुटुंबांसाठी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सन २०२३-२४ दरम्यान झालेल्या अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे विधानसभा क्षेत्रातील अनेक गावांमध्ये घरांचे तसेच जनावरांच्या गोठ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आता शासनाच्या मंजुरीनंतर बाधित कुटुंबांना आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

mla 
 
उल्लेखनीय म्हणजे, अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे गोंदिया विधानसभा क्षेत्रातील विविध गावांमध्ये नागरिकांच्या घरांचे तसेच जनावरांचे गोठे, शेडचे नुकसान झाले होते. यावेळी आ. अग्रवाल यांनी स्वतः बाधित गावांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता. तसेच पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. यासोबतच संबंधित प्रशासकीय अधिकार्‍यांना तातडीने नुकसानीचे पंचनामे तयार करून शासनाकडे पाठविण्याचे निर्देश दिले होते. याप्रकरणी आ. अग्रवाल यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला आणि बाधित कुटुंबांना योग्य आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून, गोंदिया विधानसभा क्षेत्रातील विविध बाधित गावांमध्ये घरांचे व गोठ्यांचे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी शासनाने ९० लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.
 

नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या कुटुंबांच्या घरांचे आणि गोठ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांच्यासाठी ही आर्थिक मदत अत्यंत महत्त्वाची आहे. मंजूर निधीची रक्कम दिवाळीपूर्वी सर्व पात्र नुकसानग्रस्त लाभाथ्र्यांच्या बँक खात्यात जमा व्हावी, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे सणासुदीच्या काळात बाधित कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळू शकेल.
- विनोद अग्रवाल, आमदार, गोंदिया