रिसोड,
rajesh-jahagirdar राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वाकद येथील वीर भगतसिंग शाखेचा विजयादशमी उत्सव रविवार, १ नोव्हेंबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात सामाजिक समरसतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून युवा उद्योजक सचिन तडस उपस्थित होते, तर प्रमुख वक्ते म्हणून राजेश जहागीरदार यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी प्रमुख वक्ते राजेश जहागीरदार यांनी सामाजिक समरसतेचे जिवंत उदाहरण म्हणजे संघ शाखा असे प्रतिपादन केले. संघ शाखेच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एकत्र आणून सामाजिक एकात्मता, बंधुभाव आणि राष्ट्रभावना वृद्धिंगत करण्याचे कार्य केले जाते, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल ताटर, उपखंड सहकार्यवाह यांनी केले. त्यानंतर सुभाषित, अमृतवचन आणि वैयक्तिक गीत सादर करण्यात आले.विजयादशमी उत्सवाच्या निमित्ताने स्वयंसेवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमातून सामाजिक समरसता, संघभावना आणि राष्ट्रसेवेचा संदेश देण्यात आला.