पुणे
tarun-bharat-pune-edition
पुणे येथील दैनिक तरुण भारतच्या पहिल्या दिवाळी विशेषांकाचा प्रकाशन सोहळा गुरुवारी संध्याकाळी भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या फिरोदिया सभागृहात अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
यावेळी सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता शेवाळे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. याप्रसंगी (डावीकडून) विशेषांकाचे संपादक विजय बुवा, दैनिक तरुण भारतचे मुख्य संपादक शैलेश पांडे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, श्री नरकेसरी प्रकाशनाचे कार्याध्यक्ष अनिल दांडेकर, अभिनेत्री स्मिता शेवाळे आणि दैनिक तरुण भारतच्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक सचिन कापसे उपस्थित होते.