वॉशिंगटन,
trump election defeat अमेरिकेत नुकत्याच पार पडलेल्या मध्यावधी निवडणुकीच्या निकालांमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे, ज्याचा थेट परिणाम आता अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धोरणांवर दिसून येत आहे. ही सत्ताहानी होताच ट्रम्प यांनी सावध पवित्रा घेत दोन अत्यंत महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत, ज्या संपूर्ण जगासह भारतासाठी अत्यंत दिलासादायक मानल्या जात आहेत. एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेशी बोलताना ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, इराणवर भविष्यात हल्ला करण्याची त्यांची कोणतीही योजना नसून दोन्ही देशांमध्ये लवकरच शांतता चर्चेची तारीख निश्चित केली जाईल. त्याआधी ट्रम्प यांनी इस्रायलला दिली जाणारी वार्षिक 4 अब्ज डॉलरची आर्थिक मदत थांबवण्याची घोषणा केली आहे. यासोबतच यापुढे कोणतीही आर्थिक मदत दिली जाणार नसली तरी इस्रायलला शस्त्रास्त्रे विकली जातील असे स्पष्ट केले आहे.
इराणवर हल्ला न करण्याचा निर्णय; भारतासह जागतिक बाजाराला मोठा दिलासा
ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे पश्चिम आशियातील वाढता तणाव ओसरण्यास मदत होणार असून भारताच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तज्ज्ञांच्या मते, जर अमेरिकेने इराणवर हल्ला केला असता तर प्रत्युत्तरात इराणने सामरिकदृष्ट्या महत्त्वाची मानली जाणारी ‘हॉर्मुज खाडी’ बंद केली असती, ज्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड आगडोंब उसळला असता आणि भारतासारख्या विकसनशील देशांमधील सर्वसामान्यांना महागाईच्या तीव्र झळा सहन कराव्या लागल्या असत्या. सोमवारी 2 नोव्हेंबर रोजी अमेरिकेने इराणच्या केशम बेटावर जरी हल्ला केला असला, तरी मध्यावधी निवडणुकीतील पराभवानंतर आता ट्रम्प यांनी नरमाईचे धोरण स्वीकारत शांतता चर्चेवर भर दिला आहे.
सीनेट व काँग्रेसवरील ताबा गमावल्याने ट्रम्प यांची कोंडी
अमेरिकेच्या संसदेतील (काँग्रेस आणि सीनेट) ताज्या आकडेवारीनुसार, ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला मोठा पराभव पत्करावा लागला असून काँग्रेसचा ताबा आता विरोधी डेमोक्रॅट्सच्या हातात गेला आहे. निवडणुकीच्या या निकालांनी ट्रम्प प्रशासनाला मोठा धक्का दिला असून, संसदेत बहुमत नसताना नवीन युद्धाला तोंड देणे किंवा मनमानी निर्णय घेणे आता ट्रम्प यांच्यासाठी शक्य राहिलेले नाही, कारण काँग्रेसकडून त्यांच्या प्रत्येक निर्णयाची कसून चौकशी व समीक्षा केली जाऊ शकते.
ट्रम्प यांच्या पराभवाची आणि त्यानंतर अचानक धोरण बदलण्यामागची प्रमुख कारणे:
– असोसिएटेड प्रेसच्या अहवालानुसार, देशांतर्गत वाढती महागाई हेच ट्रम्प यांच्या पक्षाच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले असून, इराणविरुद्धच्या युद्धामुळे अमेरिकी नागरिक आधीच महागाईशी झुंजत आहेत आणि यावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला अपयश आले.
– संसदेत बहुमताचा अभाव: अमेरिकी संसदेत डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व प्रस्थापित झाल्यामुळे ट्रम्प यांना नवीन युद्ध किंवा आक्रमक लष्करी कारवाया छेडणे सोपे राहिलेले नाही, कारण आता काँग्रेसकडून त्यांच्या प्रत्येक निर्णयावर कायदेशीर व राजकीय अंकुश ठेवला जाईल.trump election defeat प्रत्येक निर्णयाची शहानिशा केली जाईल.
– इस्रायलमधील राजकीय अस्थिरता: इस्रायलमध्ये सध्या बेंजामिन नेतान्याहू यांच्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही आणि आघाडी सरकार स्थापन होण्याची चिन्हे आहेत, ज्यामुळे अमेरिकेने इस्रायलपासून थोडे अंतर राखण्याचे धोरण स्वीकारल्याची चर्चा आहे.