मालेगाव तालुक्यात दुष्काळ निवारणासाठी प्रशासनाने सज्ज राहावे!

आमदार अमित झनक यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

    दिनांक :06-Nov-2026
Total Views |
मालेगाव,
drought relief तालुक्यात निर्माण होऊ पाहणारी संभाव्य दुष्काळी परिस्थिती आणि आगामी उन्हाळ्यात उद्भवू शकणारी पाणीटंचाई लक्षात घेता, दुष्काळ प्रतिबंधक उपाययोजना व पाणीटंचाई निवारणाच्या दृष्टीने आमदार अमित झनक यांच्या अध्यक्षतेखाली ६ नोव्हेंबर रोजी महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली. उन्हाळ्यात ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येऊ नये, यासाठी संबंधित विभागांनी आतापासूनच प्रभावी नियोजन करून आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, अशा स्पष्ट सूचना आमदार झनक यांनी प्रशासनाला दिल्या.
 
 
drought relief
 
 
या बैठकीत मालेगाव तालुयातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, जलस्रोतांची सद्यस्थिती, गावनिहाय पाणीटंचाईची शयता तसेच भविष्यात कराव्या लागणार्‍या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. संभाव्य टंचाईग्रस्त गावांची आतापासूनच माहिती संकलित करून आवश्यकतेनुसार टँकर, विहिरींचे अधिग्रहण, नवीन जलस्रोतांचा वापर तसेच अन्य तात्पुरत्या व कायमस्वरूपी उपाययोजनांचे नियोजन तयार ठेवण्यावर भर देण्यात आला. कोणत्याही गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही देण्यात आले. पाणीटंचाईबरोबरच उन्हाळ्यात कृषी क्षेत्रासमोर निर्माण होणार्‍या संभाव्य अडचणींचाही बैठकीत विचार करण्यात आला. दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागू नये, यासाठी कृषी विभाग आणि महावितरणने समन्वयाने काम करावे. शेतकर्‍यांच्या अडचणींची गांभीर्याने दखल घेऊन त्यांना आवश्यक ते सहकार्य करावे, अशी अपेक्षा आमदार झनक यांनी व्यक्त केली.
दुष्काळासारख्या नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी केवळ प्रशासकीय यंत्रणेवर अवलंबून न राहता लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत प्रशासन आणि नागरिक यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे. त्यामुळे गावपातळीवर संभाव्य पाणीटंचाईचा आढावा घेऊन तातडीने उपाययोजना सुचवाव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.या बैठकीला वाशीमचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी तसेच महावितरणचे शाखा अभियंता उपस्थित होते. याशिवाय तालुयातील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.संभाव्य दुष्काळाचे संकट गृहीत धरून प्रशासनाने वेळेत उपाययोजना केल्यास आगामी उन्हाळ्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करणे शय होणार आहे.drought relief त्यामुळे सर्व विभागांनी जबाबदारीने काम करून नागरिकांना आणि शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, असा सूर या बैठकीत व्यक्त झाला.