भारत-न्यूझीलंड सामना मोफत पाहण्याची संधी!

    दिनांक :06-Nov-2026
Total Views |
वेलिंग्टन,
india-vs-new-zealand-match-for-free भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. टी-२० मालिकेत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाने वनडे मालिकेतही आपले वर्चस्व कायम राखण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केल्यानंतर टीम इंडिया आता दुसऱ्या लढतीसाठी सज्ज झाली आहे. हा सामना शनिवार, ७ नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार असून, क्रिकेट चाहत्यांना तो विनामूल्य कुठे पाहता येईल, याबाबत उत्सुकता आहे.

india-vs-new-zealand-match-for-free 
 
शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे प्रभावित झाला होता. मात्र, भारतीय संघाने पाच गडी राखून विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली. आता दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेतील आपली स्थिती अधिक मजबूत करण्याचा भारताचा प्रयत्न असेल.
 
दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी ७.३० वाजता सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी सकाळी ७ वाजता नाणेफेक होईल. सामना दुपारी २.३० ते ३ वाजेपर्यंत संपण्याची शक्यता आहे. पावसामुळे पहिल्या सामन्यात व्यत्यय आला होता. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातही हवामान कसे राहते, याकडे चाहत्यांचे लक्ष असेल.
 
टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येणार सामना?
भारत-न्यूझीलंड मालिकेच्या प्रसारणाचे अधिकार सोनी स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. त्यामुळे टीव्हीवर हा सामना सोनी स्पोर्ट्सच्या संबंधित वाहिन्यांवर पाहता येईल. मोबाईल, लॅपटॉप आणि टॅबलेटवर थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी सोनी लिव्ह ॲपचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र, या माध्यमांवर सामना पाहण्यासाठी संबंधित सबस्क्रिप्शन किंवा शुल्क भरावे लागू शकते.
 
डीडी फ्री डिशवर सामना मोफत पाहण्याची संधी
ज्या प्रेक्षकांना कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता टीव्हीवर सामना पाहायचा आहे, त्यांच्यासाठी डीडी स्पोर्ट्स हा पर्याय उपलब्ध आहे. डीडी फ्री डिश कनेक्शन असलेल्या प्रेक्षकांना या वाहिनीवर सामना विनामूल्य पाहता येईल. मात्र, इतर केबल किंवा डीटीएच सेवा वापरणाऱ्यांना डीडी स्पोर्ट्सवर हा सामना पाहता येईलच असे नाही.
 
भारत आणि न्यूझीलंडचे संभाव्य संघ
भारतीय संघात रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), नमन धीर, अंशुल कंबोज, आकिब नबी, गुरनूर ब्रार, अर्शदीप सिंग, ऋतुराज गायकवाड, मोहम्मद सिराज, ईशान किशन आणि कुलदीप यादव यांचा समावेश आहे.
न्यूझीलंडच्या संघात विल यंग, टिम सेफर्ट, हेन्री निकोल्स, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, काईल जेमिसन, जेकब डफी, ब्लेअर टिकनर, निक केली, मॅथ्यू फिशर, मायकल ब्रेसवेल आणि मॅट हेन्री यांचा समावेश आहे.