बंगळुरू,
bengaluru-family-murder-caseबंगळुरूमध्ये एका ४५ वर्षीय कॅबचालकाने पत्नी आणि तिच्या माहेरच्या सहा नातेवाईकांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वैवाहिक वादातून त्याने हे हत्याकांड केल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. आरोपीने सातही जणांच्या डोक्यावर वरवंट्याने प्रहार करून त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. यामध्ये सात वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. हत्येनंतर मृतदेह कारमधून वेगवेगळ्या ठिकाणी फेकल्याचा संशय असून, या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
पत्नीच्या माहेरचे संसारात हस्तक्षेप करतात म्हणून...
पोलिसांच्या माहितीनुसार, शेखर उर्फ इंदुशेखर असे संशयित आरोपीचे नाव आहे. तो बंगळुरूमधील राजाजीनगर परिसरात राहत होता. शेखर आणि सुनीता यांच्या लग्नाला जवळपास २० वर्षे झाली होती. मात्र, त्यांच्यात वारंवार वाद होत असल्याचे सांगण्यात येत आहे. पत्नीच्या माहेरचे त्यांच्या संसारात हस्तक्षेप करतात आणि वादाच्या वेळी सुनीताची बाजू घेतात, असा शेखरचा समज होता. याच रागातून त्याने हे हत्याकांड केल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे.
एकेकाला घरी बोलावले अन्...
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, १७ ऑक्टोबरच्या सुमारास शेखरने वेगवेगळी कारणे सांगून पत्नी आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांना आपल्या घरी बोलावले. सुरुवातीला पत्नी सुनीताची, त्यानंतर मेहुणे शिवकुमार आणि शंकर यांची हत्या केल्याचा आरोप आहे. पुढे सासू रूपावती नंतर रूपावती यांच्या सुना दिव्या आणि नलिनी, तसेच सात वर्षांचा पुनित यांचाही त्याने जीव घेतल्याचा संशय आहे.
शेखरने हत्यांसाठी स्थानिक भाषेत 'ओरालू कल्लू' किंवा 'रुब्बू गुंडी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पारंपरिक दगडी वाटण्याच्या साधनाचा वापर केल्याचा आरोप आहे. त्याने कुटुंबातील सदस्यांच्या डोक्यावर वरवंट्याने प्रहार केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आल्याचे सांगितले जात आहे.